बीड दि. 18 ( लोकाशा न्यूज)कोरोना विषाणू रुग्णांची संख्या बीड जिल्हयात मोठया प्रमाणात वाढ होत असल्यामुळे बीड , अंबाजोगाई , माजलगांव , परळी , केज व आष्टी हे 06 शहर दिनांक 12 ऑगस्ट पासून दिनांक 21 ऑगस्ट 2020 रोजी पर्यंत पूर्णपणे सर्व दृष्टीने बंद राहील असे आदेश पारीत करण्यात आले होते. या 6 शहरामधील 10 वीचा निकाल घोषित झालेला असून या शहरामधील विद्यार्थ्यांना इतर शहरामधील कॉलेजसाठी ऍडमिशन घेण्यासाठी आणि या संस्थांच्या प्रवेशाची अंतिम तारीख जवळ आलेली असल्यामुळे इयत्ता 10 वर्गातील टि.सी.व मार्क मेमो काढणेसाठी विद्यार्थी / पालक व शिक्षक यांना परवानगी देणे आवश्यक आहे . त्यादृष्टीने परवानगी देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काढले आहेत.
काय असतील नियम
◆इयत्ता 10 वी पास विद्यार्थी व त्यांचे एक पालक यांना फक्त टि.सी. व मार्क मेमो या सहा शहरामधील शाळेमधून काढणेसाठी परवानगी असेल. या शहरांमध्ये प्रवेश करण्यास व शाळेमध्ये जाणे यासाठी पासची आवश्यकता असणार नाही , परंतु शाळेचे ओळखपत्र व पालकांचे आधारकार्ड सोबत ठेवणे बंधनकारक असेल .
◆ संबंधित शाळेचे शिक्षकांना यासाठी वेळेच कोणतेही बंधन न ठेवता 24 तास दररोज शाळेमध्ये थांबून कामकाज करण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे .
◆ इयत्ता 10 वी पास विद्यार्थी / पालक हे शाळेमध्ये आल्यानंतर एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही या दृष्टीने नियोजन करुन कोवीड -19 विषयक सामाजिक अंतर पाळणे बाबत प्रत्येक शाळेने सक्त सूचना द्याव्यात आणि त्याची खात्री करण्याची जबाबदारी संबंधित शाळेची राहील. सदरचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.