Site icon लोकाशा-बंब न्यूज

कोरोनाच्या संकटामुळे शेतकऱ्यांनी मिरवणूक काढू नये – सुरेखा धस



धारूर : कोरोनाच्या संकटामुळे दिवसेंदिवस नवनव्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे, कोरोनाची वाढती सकाळी तोडण्यासाठी प्रशासन काटेकोरपणे प्रयत्न करत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी दरवर्षी प्रमाणे या वर्षी पोळा सण साजरा करताना मिरवणूक काढू नये, गर्दी करू नये, शेतातच साध्या पद्धतीने बैलांची पूजा करून पोळा साजरा करावा, असे आवाहन धारूर ठाण्याच्या ठाणेदार सुरेखा धस यांनी शेतकरी बांधवांना केले आहे, यावेळी त्यांनी पोळ्यानिमित शेतकऱ्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.
सद्या कोरोना या रोगाचे सावट दिवसेंदिवस घट्ट होत चालले आहे. धारूरला ही कोरोनाने घेरले आहे, कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हाधिकारी साहेबांनी जमावबंदीचा आदेश लागू केलेला आहे, कोरोनाचे संकट प्रत्येक सणावर येऊन ठेपले आहे.आज दि. 18 ऑगस्ट रोजी शेतकरी राजाचा पोळा हा सण आहे. तरी शेतकऱ्यांनी आपल्या बैलांची शेतातच पूजा करावी, दरवर्षीप्रमाणे मिरवणूक कोणीही काढू नये तसेच कोणीही एकत्र जमा होऊ नये याची काळजी घेणे, जेणेकरून आपण व आपल्या परिवाराची कोरोना या रोगापासून सरंक्षण होईल व या रोगापासुन दुर रहाल. सध्या शासनाच्या आदेशाप्रमाणे सर्व धार्मिक स्थळे बंद आहेत तरी कुणीही धार्मिक स्थळी एकत्र येऊ नये आपण आपल्या घरीच पोळा हा सण साजरा करावा असे आवाहन करत धारूर पोलीस ठाण्याच्या ठाणेदार api सुरेखा धस यांनी सर्व शेतकरी बांधवांना पोळ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Exit mobile version