Site icon लोकाशा-बंब न्यूज

एपीआय गणेश मुंडे यांची गेवराई येथे बदली


बीड, एपीआय गणेश मुंडे यांची गेवराई येथे बदली करण्यात आली आहे, त्यांच्या बदलीचे आदेश 3 डिसेंबर रोजी काढण्यात आले आहेत.
गणेश मुंडे एक कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत ,त्यांनी बीड जिल्ह्यात अत्यंत चांगल्या पद्धतीने कर्तव्य बजावलेले आहे, अनेक कारवयाच्या माध्यमातून त्यांनी माफीयांना दणके दिलेले आहेत, विशेष म्हणजे त्यांनी वाळूच्या अनेक रेड केल्या असून १० कोटीपर्यंत मुद्देमाल जप्त केलेला आहे, त्यामुळेच माफियानी त्यांची धास्ती घेतली होती, मागच्या काही दिवसांपूर्वी त्यांची नळदुर्ग येथे बदली करण्यात आली होती, आता पुन्हा एकदा त्यांची गेवराई येथे महामार्ग पोलिस विभागात बदली करण्यात आली आहे, तीन डिसेंबर रोजी त्यांच्या बदलीचे हे आदेश काढण्यात आले असून ते लवकरच आपल्या पदाचा पदभार स्वीकारणार आहेत.

Exit mobile version