Site icon लोकाशा-बंब न्यूज

48 तासात झाला खुनाचा उलगडा, मुख्य आरोपी पुण्यावरून अटक, बीड शहर पोलिसांची कामगिरी

दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री मोंढा रोडने नदीच्या कडेला तांदळवाडी हवेली येथील युवकाचा दगडाने ठेचून खून झाला होता. सुरुवातीला मयताची ओळख सुद्धा पटत नव्हती परंतु बीड शहर पोलिसांनी अतिशय बारकाईने तपास करून यातील मयताची ओळख तर पटवली परंतु यातील सर्व चारही मारेकऱ्यांना 48 तासाच्या आत अटक केली आहे. यातील मुख्य दोन आरोपी हे खुनानंतर पुणे येथे फरार झाले होते परंतु माहिती बातमीदाराच्या पक्क्या माहितीच्या आधारे यातील राहिलेले दोनही आरोपी पुणे येथून अटक करण्यास बीड शहर पोलिसांना यश आले आहे. 
 आता ही दोन आरोपी अटक झाल्यानंतर खून कसा आणि का करण्यात आला याची संपूर्ण माहिती समोर आली आहे. ज्या ठिकाणी खून झाला ते ठिकाण ही निर्जन ठिकाण असून त्या ठिकाणी यातील महिला आरोपी टिंब टिंब तिने तात्पुरते राहण्याची निवास व्यवस्था केली आहे. त्या महिलेकडे यातील मयत हा प्रियकर असून त्या महिलेकडे त्याची सतत जाणे येणे असायचे. परंतु तिच्याकडे इतर कोणी आलेले त्याला आवडायचे नाही. पुणे इथून अटक केलेले आरोपी रामु बंडू चित्रे   राहणार यादवाचा मळा माळीवेस आणि
Exit mobile version