बीड, नेहमीप्रमाणे याही निवडणुकीत देशाचे नेते शरद पवार यांनी बीड जिल्हा आपल्या रडारवर घेतला आहे, त्या अनुषंगाने त्यांनी यापूर्वी बीड जिल्ह्यात परळी, आष्टी आणि बीड या ठिकाणी सभा घेतलेले आहेत, त्यांच्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माजलगाव आणि केज मध्ये सभा घेतलेली आहे, तसेच काल सुप्रिया सुळे यांनी आष्टी येथे सभा घेतलेली आहे, त्याचप्रमाणे आज आष्टीत जयंत पाटील तर केजमध्ये आ. रोहित पवार यांची सभा होत आहे, तर उद्या शरद पवार यांची माजलगावात सकाळी अकरा वाजता सभा होणार आहे, यावरूनच त्यांनी आपले उमेदवार आ. संदीप क्षीरसागर, राजेसाहेब देशमुख, महेबुब शेख, मोहन जगताप आणि पृथ्वीराज साठे यांच्या विजयासाठी मोठा डाव टाकल्याचे दिसून येत आहे. दरम्यान उद्याच्या सभेतून पवार काय आव्हान करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शरद पवारांच्या रडारवर बीड जिल्हा,आज जयंत पाटील, आ. रोहित पवार यांच्या तर उद्या शरद पवारांची माजलगावात सभा
