Site icon लोकाशा-बंब न्यूज

भाजपच्या मराठवाडा प्रवक्ता पदी पुन्हा एखदा राम कुलकर्णी तर पॅनेलिस्टचे सदस्यपद आ. सुरेश धसांकडे


मुंबई : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आगामी काळासाठी प्रवक्ते व पॅनेलिस्ट यांची नियुक्ती जाहीर केली आहे. मुख्य प्रवक्ता म्हणून यापूर्वीच केशव उपाध्ये यांची नियुक्ती करण्यात आली असून आज 10 प्रवक्ते व 33 चर्चा प्रतिनिधींची घोषणा करण्यात आली आहे. मराठावाड्याच्या प्रवक्तापदी अंबाजोगाईचे राम कुलकर्णी यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पॅनेलिस्ट म्हणून आष्टी येथील आमदार सुरेश धस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ता – केशव उपाध्ये, प्रवक्ता : खा.भारती पवार-उत्तर महाराष्ट्र, आ.गोपीचंद पडळकर, पश्चिम महाराष्ट्र, आ. राम कदम-मुंबई, शिवराय कुलकर्णी-विदर्भ, राम कुलकर्णी-मराठवाडा, एजाज देखमुख-मराठवाडा, भालचंद्र शिरसाट-मुंबई, धनंजय महाडीक-प. महाराष्ट्र, श्वेता शालिनी-पुणे, अ‍ॅड. राहुल नार्वेकर-मुंबई तर पॅनेलिस्ट म्हणून नियुक्ती करण्यात आलेले सदस्य गणेश हाके, अतुल शाह, आ.गिरीष व्यास, अवधूत वाघ, शिरीष बोराळकर, सुनील नेरळकर, सुधीर दिवे, डॉ.अनिल बोंडे, आ.अमित साटम, प्रवीण घुगे, रिदा रशीद, गणेश खणकर, मकरंद नार्वेकर, विनायक आंबेकर, शेखर चरेगांवकर, श्वेता परूळेकर, आ.सुरेश धस, प्रदीप पेशकार, आ.निरंजन डावखरे, लक्ष्मण सावजी, आरती पुगावकर, आरती साठे, राजीव पांडे, दिपाली मोकाशी, नितीन दिनकर, धर्मपाल मेश्राम, किशोर शितोळे, प्रेरणा होनराव, शिवानी दाणी, स्वानंद गांगल, आनंद राऊत, राम बुधवंत, प्रीति गांधी यांची निवड करण्यात आली आहे.

Exit mobile version