बीड, विधान सभेच्या मतदानासाठी आता फक्त आठ दिवस उरले आहेत, या अनुषंगानेच राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत, सर्वात महत्वाचे म्हणजे आता माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी डॉ. योगेश क्षीरसागर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे आता महायुतीचे उमेदवार डॉ. क्षीरसागर यांचे बीडमध्ये आणखी बळ वाढले आहे. जयदत्त क्षीरसागर यांची प्रेस सुरू असून या परिषदेला डॉ. योगेश क्षीरसागर, सारिका क्षीरसागर, गंगाधर घुमरे, गणपत डोईफोडे, हेमंत क्षीरसागर, विलास विधाते यांच्यासह अदींची उपस्थिती आहे.