Site icon लोकाशा-बंब न्यूज

NEET आणि JEE परीक्षा सप्टेंबरला होणार

बीड,दि.17: कोरोनाच्या काळात परीक्षा घेणे किती सुरक्षित आहे, यावरून देशात अद्यापही वाद सुरूच आहे. दरम्यान यातच सुप्रीम कोर्टाने NEET आणि JEE परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी फेटाळली आहे. कोरोनाच्या काळामध्ये परीक्षा घेणे धोकादायक होऊ शकते त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी एका याचिकेत करण्यात आली होती. मात्र आता परीक्षा घेताना सर्व काळजी घेतली जाईल असा दावा नॅशनल टेस्टिंग एजेंसीने कोर्टात केल्यानंतर परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी फेटाळण्यात आली. 1 ते 6 सप्टेंबर 2020 रोजी JEE परीक्षा होणार आहे. तर, NEET परीक्षा 13 सप्टेंबरला आहे. या दोन्ही परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात यासाठी एकूण 11 विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेमध्ये लाखो लोकांचा जीव धोक्यात घातला जात आहे. कोरोनाच्या काळात सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या असताना NEET आणि JEE घेणे धोक्याचे ठरू शकते.मात्र, नॅशनल टेस्टिंग एजेंसीने सुनावणीदरम्यान कोर्टात परीक्षा घेताना सर्व काळजी घेतली जाईल असा दावा केल्यानंतर ही मागणी फेटाळण्यात आली. 

Exit mobile version