Site icon लोकाशा-बंब न्यूज

बीडमध्ये डॉ. योगेश क्षीरसागर यांची ताकत वाढली, दहा सरपंच आणि दोन उपसरपंचांचा योगेश क्षीरसागर यांना पाठिंबा

बीड (प्रतिनिधी)
दि.९ : विधानसभेची निवडणूक जस जशी जवळ येत आहे तस तशी बीड मतदार संघातील महायुतीचे उमेदवार डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. बीड मतदारसंघातून हजारो शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश होत असतानाच आता विकासाच्या मुद्द्यावर १० सरपंच व २ उपसरपंचांनी डॉ.योगेश क्षीरसागर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. या पाठिंब्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत डॉ.योगेश क्षीरसागर यांची ताकद वाढली आहे.

बीडच्या मतदारसंघात मागील पाच वर्षात विकासकामे न झाल्याने नाळवंडी सर्कल आणि शिरूर तालुक्यातील अनेक गावातील सरपंचांनी डॉ.योगेश क्षीरसागर यांना पाठिंबा दिला असल्याचे सांगितले. पाठिंबा देणाऱ्या सरपंच आणि उपसरपंच यामध्ये कैलास घुगे सरपंच (बोरफडी), अशोक शिंदे सरपंच (हिवरापहाडी), संजय सलगर सरपंच (बाबुळखुंटा), अभिजीत खाडे सरपंच (जांब), सतीश वनवे सरपंच (पाटोदा बेलखंडी), शिवमूर्ती सानप सरपंच (पौंडूळ), रवीदादा गंगावणे सरपंच जुजगव्हाण), जयराम गीते सरपंच (रुद्रापूर), बालाजी शिंदे सरपंच (खांबा लिंबा), संतोष तांदळे सरपंच (हिंगणी. खू) श्रीराम सुरवसे उपसरपंच (जुजगव्हाण),
रेवणनाथ धांडे उपसरपंच (खांबा लिंबा) यांचा समावेश आहे.

चौकट
डॉ.योगेश क्षीरसागर मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील; सरपंच, उपसरपंचांचा प्रवेश

डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली बीड मतदारसंघाचा विकास करण्यासाठी अनेक सरपंच, उपसरपंच यांनी डॉ.योगेश क्षीरसागर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. डॉ.योगेश क्षीरसागर हे सर्व जाती धर्मातील सोबत घेऊन पुढे जाणारे नेतृत्व आहे. सुख-दुःखात धाऊन जाणारे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी कसलेही संविधानिक पद नसताना आमच्या सर्कलमध्ये अनेक विकासाची कामे केली आहेत. मागील पाच वर्षात आमच्या भागातील विकासकामे झाली नाहीत. त्यामुळे त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत मोठ्या मतधिक्याने निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करणार असल्याचे पाठिंबा देणाऱ्या सरपंच, उपसरपंच यांनी सांगितले.

Exit mobile version