Site icon लोकाशा-बंब न्यूज

हातभट्टी दारूवाल्यावर बीड शहर पोलिसांची कारवाई, 60 हजाराचा माल पकडला, मद्यपी आणि विक्रेत्यांची पळापळ



बीड, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध धंदे नियंत्रण आणण्यासाठी, त्याचप्रमाणे गुंडगिरी, दारूगिरी यावर नियंत्रण करण्यासाठी बीड शहर पोलिस सतत कारवाया करत आहे.
आज सकाळी सकाळी बीड शहराचे बीड शहर पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांनी कबाड गल्ली भागातील हातभट्टी अड्ड्यावर छापा मारला. यात करुणा समाधान गायकवाड, हरी किसन गायकवाड राकेश प्रभाकर उर्फ गुडबा जाधव सर्वजण पातुरगडी पातुर गल्ली बीड यांच्याकडे सर्व मिळून 60000 रुपयांचा गावठी हातभट्टी चा मुद्देमाल मिळून आला आहे त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.. छापा मारल्या त्यावेळी तेथील 05 मद्यापी लोकांस ही पोलीस ठाण्यात आणले आहे. त्यावेळी तेथे मोठी पळापळ झाली होती.
सदरील कारवाई, पोलीस अधीक्षक श्री. अविनाश बारगळ, अपर पोलीस अधीक्षक बीड श्री. सचिन पांडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. विश्वांबर गोल्डे, बीड, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ, पोलीस अंमलदार सुशील पवार पोलीस नाईक जयसिंग वायकर, अश्फाक सय्यद व मनोज परजने, यांनी केली आहे.

Exit mobile version