जालना :- मराठा मुस्लिम व दलित बांधवांच्या मदतीने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यावर चर्चा सुरू होती. काल रात्री उशिरापर्यंत मित्र पक्षांनी त्यांच्या उमेदवारांची यादी दिली नाही. केवळ एका जातीवर निवडणूक लढवणे शक्य नसल्याचे सांगत एकही उमेदवार देणार नसल्याची भूमिका मराठा युद्ध मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी जरांगे पाटील यांनी उमेदवारी दाखल केलेल्या इच्छुकांना आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे आवाहनही केले. दरम्यान आता या निर्णयामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. जरांगे पाटलांकडून उमेदवारी मिळवून आपण विजयी होऊ ही आज लावून बसलेल्यांची मात्र ब्रह्म निराशा झाली आहे.
अखेर जरांगेंची पाडापाडीची भूमिका; एकही उमेदवार देणार नाहीत
