परळी प्रतिनिधी. शहरातील ज्येष्ठ पत्रकार आणि दैनिक लोकाशाचे तालुका प्रतिनिधी दिलीप बद्दर यांचे अल्पशा आजाराने आज उपचारादरम्यान संभाजीनगर येथे रात्री 8 वाजता दुखद निधन झाले.
शहरातील एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून दिलीप बद्दर यांची ओळख होती .अनेक वर्षे त्यांनी दैनिक सामनाचे प्रतिनिधी म्हणून काम पाहिलेले आहे. तसेच त्यांच्या पत्नी शोभनाताई बद्दर या परळी नगर परिषदेच्या नगरसेविकाही होत्या. परंतु त्यांच्या पत्नीचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले होते. दिलीप बदर हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर शिर्डी येथे खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आला होता. त्यानंतर ते पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे खाजगी रुग्णालयात ऍडमिट होते. उपचारादरम्यान आज दिनांक 30 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता त्यांचा मृत्यू झाला.
त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि दोन मुली आहेत. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या दुःखात बंब परिवार व दैनिक लोकाशा परिवार सहभागी आहे.