बीड, दि. 27 (लोकाशा न्यूज) : महायुतीमध्ये बीड या विधानसभेच्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही, त्यामुळे ही जागा नेमकी कुणाला असा प्रश्न सर्व मतदार संघाला पडलेला आहे. याच पार्श्वभुमिवर आज शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मी माझ्या पक्षाकडून धनुष्यबाणावर हा अर्ज दाखल केला असल्याचे अनिल जगताप यांनी म्हटले आहे. यावर दुपारी चार वाजेपर्यंत अधिकृतपणे जागेचा निर्णय होईल, त्यामुळे बीड मतदार संघात मीच विरोधकांसाठी खर्या अर्थाने मोठे आव्हाण असणार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
अखेर अनिल जगतापांनी उमेदवारी अर्ज भरला
