Site icon लोकाशा-बंब न्यूज

सीमा तपासणी नाक्यावर पकडला 40 किलो गांजा, बीडच्या आरटीओ पथकाची कारवाई


बीड, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बीड येथे कार्यरत असणारे आरटीओ इन्स्पेक्टर श्री संतोष पाटील व त्यांची टीम यांनी सीमा तपासणी नाका उमरगा येथे वाहन तपासणी दरम्यान ४० किलो‌ गांजा जप्त केला असून सदर व्यक्ती कर्नाटक मधून महाराष्ट्र मध्ये हा गांजा राज्य महामंडळाच्या बसने घेऊन येत असताना पकडला गेला.
दिवाळी व आचारसंहिता यामुळे आरटीओ विभागाच्या परिवहन आयुक्त यांच्या आदेशान्वये आंतरराज्य वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून आचारसंहितेचा भंग तसेच अमली पदार्थांची तस्करी होऊ नये म्हणून विशेष तपासणी मोहीम राबवली जात आहे.
या मोहिमेत बीड कार्यालयाचे मोटर वाहन निरीक्षक श्री संतोष पाटील यांनी कर्नाटक मधून महाराष्ट्रात येणाऱ्या बसची तपासणी केली असता एका बस मधून अंदाजे ४० किलो गांजा तस्करी करणाऱ्या संशयित व्यक्तीची तपासणी केली असता त्याच्याकडे असणाऱ्या बॅगमध्ये ४० किलो गांजा सापडला.
सदर व्यक्तीस पुढील कारवाईसाठी व गुन्हा दाखल करणे करता उमरगा पोलीस स्टेशन येथे ताब्यात देण्यात देण्यात आले आहे.

आरोपीचे नाव राम विठोबा हिरवे असून त्याच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आरटीओ कार्यालय तर्फे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Exit mobile version