बीड, दि. 27 (लोकाशा न्यूज) : महायुतीत गेवराई आणि आष्टीच्या जागेची आदलाबदल होणार असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. त्याअनुषंगानेच महायुतीने गेवराईची जागा अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादीला सोडली आहे. त्यामुळे आता आष्टीची जागा भाजपला सुटणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे आष्टीतून माजी मंत्री सुरेश धस यांच्या उमेदवारीचा मार्ग जवळपास मोकळाच झाल्याचे मानले जात आहे.