Site icon लोकाशा-बंब न्यूज

कोट्यावधींचा घोटाळा करणारा रामकृष्ण बांगर यांना अखेर अटक; पोलिस अधीक्षकांच्या नेतृत्वात सपोनि दराडेंची मोठी कामगिरी

बीड — महात्मा फुले बँकेच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांच्या घोटाळा प्रकरणातील आरोपी रामकृष्ण मारोतराव बांगर यांना वाशिम येथून अटक करण्यात आली आहे. एस पी च्या आदेशावरून सपोनी बाळराजे दराडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

रामकृष्ण मारोतराव बांगर वय 70 वर्ष यांनी शैक्षणिक संस्था, दूध डेरी, महात्मा फुले अर्बन बँक यासारख्या संस्था स्थापन करून राजकारणात देखील आपली छाप उमटवली होती.मात्र आपल्या राजकीय हितसंबंधाचा वापर करून सहकारी संस्थांमध्ये कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केला. त्यांचे वेगवेगळे कारनामे उजेडात येऊ लागले. महात्मा फुले अर्बन बँकेच्या माध्यमातून 14 कोटी रुपयांच्या घोटाळ्यांचा गुन्हा देखील त्यांच्यासह 41 जणांवर दाखल झाला होता.
गेल्या 30 ते 40 वर्षापासून अनभिषिक्त सम्राट बनलेल्या रामकृष्ण बांगर यांचे कुटुंब फरार झाले होते. रामकृष्ण बांगर यांच्यावर कलम 420, 409, 467, 468, 471, 120 (ब) अन्वये गुन्हा दाखल आहे. त्यांच्या पत्नी सत्यभामा बांगर यांना सपोनी बाळराजे दराडे यांनी सापळा रचून तुळजापूर येथे देवीचे दर्शन घेऊन घरी आलेल्या असताना मंगळवार दि. 8 ऑक्टोबर रोजी घरातून पकडले होते.
दरम्यान पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या आदेशावरून सपोनी बाळराजे दराडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.उ.निरीक्षक महेश विघ्ने, पो.ह. दुबाले जायभाये यांना सोबत घेऊन मिळालेल्या माहितीवरून वाशीम येथे सापळा रचला. रामकृष्ण बांगर हॉटेल गुलाटी समोर आले असताना त्यांना जेरबंद करण्यात आले. पुढील कारवाईसाठी पाटोदा पोलीस ठाणे याच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईमुळे खळबळ माजली आहे.

Exit mobile version