बीड, दि. 23 (लोकाशा न्यूज) : पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्याकडून सुरू असलेल्या कारवयांच्या दणक्यांमुळे अवैध धंद्यांवाल्यांना हादर्यावर हदरे बसू लागले आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली बीडमध्ये एपीआय बाळराजे दरांडे यांनी गुटख्याचा कंटेनर पकडला आहे. बीडच्या जुन्या आरटीओ कार्यालयाजवळ एक कंटेनर भरून गुटखा सपोनि बाळराजे दराडे यांनी पकडला आहे. राजनिवास गुटखा लातूरकडे जात असताना ही कारवाई करण्यात आली. यात 1 कोटींच्या पुढे माल असून कंटेनर आणि गुटखा ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे यांनी अवैध धंद्यावर केलेल्या कारवाया मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहेत. बुधवारी रात्री 8 च्या सुमारास त्यांनी जुन्या आरटीओ कार्यालयाजवळ सापळा रचून गुटख्याने भरलेल्या पूर्ण कंटेनर ताब्यात घेतला आहे. यात राजनिवास हाच गुटखा असून तो छत्रपती संभाजी नगरवरून लातूरकडे जात असल्याची प्राथमिक माहिती आहे. सपोनि बाळराजे दराडे यांनी केलेल्या या कारवाईमुळे गुटखा माफियांचे मात्र धाबे दणाणले आहेत.1 कोटींच्या पुढे सदर गुटखा असल्याची माहिती असून सध्या हा कंटेनर पोलीस मुख्यालयात आणण्यात आला आहे.