बीड:बांधकाम परवान्यासाठी मागितली बारा लाखाची लाच, बीड नगर पालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यासह दोघांना ठोकल्या बेड्या, बीड एसीबीची मोठी कारवाई, शहरात उडाली मोठी खळबळ
▶️ युनिट- बीड
▶️ तक्रारदार- पुरुष, वय- 40 वर्ष,रा. बीड, ता. जि.बीड
▶️ आलोसे – 1.श्री. फारुकी अखिल आहेमद वकील आहेमद, वय 50 वर्ष, कनिष्ठ अभियंता, नगर परिषद, बीड वर्ग 3.
- खाजगी इसम किशोर कोंडीराम खुरमुरे, वय 35 वर्षे, रा. स्वराज्य नगर, बीड.
➡️लाच मागणी दिनांक – 27/08/2024
▶️ लाच मागणी 9,00,000/-रुपये
▶️ ठिकाण- श्री.आखिल यांचे SBI bank राजुरी वेस, बीड लगत राहते घरी
▶️ कारण – यातील तक्रारदार यांचे वडील व त्यांचे शेजारी यांचे बांधकाम परवाना काढण्यासाठी नगर रचना विभाग, नगर परिषद, बीड येथील परवानगी देण्यासाठी लोकसेवक श्री.फारुकी आखिल यांचे खाजगी मदतनीस श्री. किशोर खूरमुरे यांनी 12,00,000(बारा लाख)रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 9,00,000
(नऊ लाख)रुपये ची मागणी करून लोकसेवक श्री.फारुकी अखिल यांनी लाच रक्कम स्वतःसाठी मिळावी म्हणून लाच रक्कम खाजगी इसम श्री किशोर खुरमुरे यांचेकडे देण्यास सांगून प्रोत्साहन दिले म्हणून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
पो. स्टे.बीड शहर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
➡️ सापळा अधिकारी- श्री.शंकर शिंदे, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. बीड मो. न. 9355100100
▶️मार्गदर्शक- श्री संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर.
9923023361
श्री.मुकुंद अघाव , अपर पोलिस अधीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर मो. क्र.9881460103
➡️सापळा पथक – पोलीस अंमलदार, सांगळे, गोरे, गिराम, राठोड, गरदे, गवळी, खरसाडे, निकाळजे गणेश मेहेत्रे ला. प्र. वि. बीड
जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांचेकडे कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांचे वतीने खाजगी इसम कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ अमाचेशी संपर्क साधावा.
भ्रष्टाचारा संबंधित काही तक्रार असल्यास
*टोल फ्री क्र:- 1064
*मा.पोलीस अधीक्षक, लाप्रवि.छत्रपती संभाजीनगर :-9923023361* पोलीस उपाधीक्षक शंकर शिंदे ला. प्र. वि. बीड
मो.9355100100
वर संपर्क साधावा.