आष्टी-पाटोदा- शिरूर मतदार संघातील जागा वाटपाचा तिढा कायम असतांना आष्टीचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी हजारो कार्यकर्तांसह आपला उमेदवारी अर्ज बुधवारी सकाळी दाखल केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमध्ये आष्टीच्या जागेवरून वरिष्ठ पातळीवर चर्चेच्या फेर्या झडत असतांनाच धोंडे यांनी आपला अर्ज दाखल केला. माजी आमदार सुरेश धस यांनी बुधवारी पुन्हा देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
आष्टीतून भीमराव धोंडेंची उमेदवारी दाखल
