जालना, मनोज जरांगे पाटील यांनी रणशिंग फुंकले आहे. उपस्थित कार्यकर्त्यांसोबत बोलताना जरांगेंनी निवडणुकीत उतरवण्याचा प्लॅन सांगितला. समिकरण जुळवाजुळव सुरु असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.आपण कुठं निवडून येऊ शकतो. दलीत मुस्लिम एकत्र आहे ते पाहुयात. मी समीकरण जुळवत आहे. तुम्ही फॉर्म भरून घ्या. फॉर्म मागे घ्यायच्या रोजी आपण सांगू. फॉर्म कुणाचा मागे घ्यायचा, असे मनोज जरांगे म्हणाले.
प्रत्येक मतदारसंघात १ लाख मतदान आहे. कुणाला लीड तुटते. पक्षा नेत्याकडून बोलू नका, समाजाकडून बोला. आंदोलन उघडे पडू देणार नाहीत हे सांगा. मला माझ्या समजासाठी आंदोलन करायचे आहे. मविआ आणि महायुती आरक्षण देतो म्हणत नाहीत. महायुती,मविआने अजून यादी जाहीर केली नाही. पण जर आपलं ठरले तर दोघांचा कार्यक्रम करायचा, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मला एकटे पडू देऊ नका. जिथं निवडून येतील तिथं उभे करावे. Sc st च्या जागी उमेदवार देऊ नये. तिथं आपल्या विचारांच्या माणसाला मते देऊ. जिथं उभे करणार नाही पण जो आपल्याला जो ५०० बाँडवर लिहून देईल, त्याला मतदान देऊ, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. ज्याला आपली मागणी मान्य आहे जो आपल्या विचारांचा आहे त्याला मत द्यायला काय हरकत काय?
उभे करायचे की पडायचे? असा सवाल यावेळी मनोज जरांगे यांनी उपस्थित मराठ्यांना विचारला. यावेळी सर्वांनी एकच लढण्याचा निर्धार केला. माजी निवडणुकीकडे जायची इच्छा नाही, पण मी समाजाच्या पुढे नाही. समाजाचे जे म्हणणं ते माझं आहे, असे म्हणत जरांगे यांनीही खो दिला. आपण राजकारणात जाऊ नये, अशी माझं म्हणणं आहे. पण तुम्ही सर्वांनी पाडायचे की उभे राहायचे ठरवा. माझी इच्छा राजकारणात जायची इच्छा नाही.
जर उभा करायचं ठरलं तर माझे प्रश्न आहे. उभा करायच्या नादात माझ्या समाजाचा प्रश्न मागे राहील. राजकारण झाले तर माझा समज पुन्हा एकत्र राहील का? महावि आणि महायुतीवाले सगळे सख्खे मावस आहेत. आपण उभे राहिले की भाजप वाले खुश होतील. आणि उभे नाही केले तर माहाविकास आघाडी वाले खुश होतील, असे जरांगे म्हणाले. आपल्या हाताने आपण संपू नये म्हणून वेगळा मार्ग काढला पाहिजे. आपण गाफील राहिलो तर अवघड आहे, असेही जरांगे म्हणाले.
आपले लोकं म्हणतात पटकन निर्णय घ्या. मग आपण १३ महिने काय केले? फॉर्म भरायला वेळ आहे. चिन्ह मिळायला वेळ आहे. मग प्रचार कसा करायचं? गडबड कशाला करायची. आपल्याला जे चिन्ह मिळाले ते दोनच तासात राज्यात जाईल. चिन्हाचा लोड नाही. प्रचाराचा गरज नाही. जरी लोकांनी उमेदवाराचे तोंड नाही पाहिले तर मतदान करा. तुमचे त्यांनी काम केले नाही तर मी आहे *** लावायला. राजकारणाचा इतका नाद लागू देऊ. आपला समाजाने लय संघर्ष केला आहे. समजासोमोर संकट उभे केले आहे.
80% पेक्षा जास्त मतदान एक शिक्का चालणार आहे. मतदार याद्या चाळा, गावतील नसलेले मतदान शोधून काढा. आपल्याला मतदान एजंट गरज नाही. अख्खा गावच एजंट आहे. उमेदवार गडबड करत आहेत, लवकर डिक्लेर करा म्हणत आहेत का? तर तयारी करायची आहे. आपण 13 महिने काय केल? तयारी केलीच आहे. चिन्ह माहिती नाही गावोगाव जाऊन काय सांगणार? आपण उमेदवार, चिन्ह सांगितल्यावर दोन घंट्यात हे चिन्ह जगात माहित होणार आहे, चिंता करू नका. गरजवंत मराठे यांना गडबड नाही, ते 20 नोव्हेंबरला शांत डोक्याने मतदान करतील, असे मनोज जरांगे म्हणाले. आपल्याला संपवण्याचा विडा उचलणाऱ्यांना संपवायचं म्हणजे संपवायचे. इथून पुढच्या काळात प्रत्येकाला वाटलं पाहिजे की मराठ्यांना संपवायला जाणाऱ्यांना संपाव लागते, असा इशारा जरांगेंनी दिला.
तुमचं मन जर कुणाला विकले तर तुमची जात संपेल. मराठा रस्त्याने जाताना टाईट चालला पाहिजे. मान खाली घालून जायला नाही पाहिजे. या निवडणुकीच्या आणि राजकारणाच्या नादात मराठ्यांची मान खाली जाऊ द्यायची नाही. समाजाची पावित्र्य जपा. समाजाची उंची जपा समाज हा सागरासारखा राज्यात पसरला आहे राज्याच्या बाहेर सुद्धा आहेत काही करून हा समाज संपवू देऊ नका. आपल्याला महाविकास आघाडीचे महायुतीचे काही देणे घेणे नाही. तुमच्यासाठी मी माझा प्रामाणिकपणा जपला आहे. मॅनेज झालो नाही. ढळलो नाही. माझी तळमळ आणि माझी कळकळ समाजासाठी आहे. निवडणुका येतील निवडणुका जातील. आपला तो हट्ट नाही, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.