कंडक्टर आणि प्रवाशांमध्ये अगदी तिकीटापासून ते बसच्या थांब्यापर्यंत छोटे वाद होत असतात, पण ते वाद तेवढ्या पुरते असतात. बीडमध्ये चक्क बसच्या कंडक्टरला चपलेनं कपडे फाटेपर्यंत मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतकच नाही तर पती-पत्नी दोघांनी या कंडक्टरला खाली उतरवून बेदम मारहाण केली आहे.
रस्त्यात बस थांबवण्यासाठी बसमधील घंटी वाजवून कंडक्टरला खाली ओढून पती आणि पत्नीने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्यानं पती आणि पत्नी दोघांविरोधात कंडक्टर-ड्रायव्हरने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये प्रवासी महिला कंडक्टरला चप्पलने बेदम मारहाण करत असल्याचं दिसत आहे.
इतकं मारहाण करण्यापर्यंत नेमकं काय दोघांमध्ये कारण होते ते अद्याप समोर आलं नाही. मात्र प्राथमिक माहितीनुसार त्यांच्यात बसची घंटी वाजवण्यावरुन आधी भांडण झालं होतं. धारूर आगाराची धारूर-माजलगाव गाडीचे कंडक्टर शहादेव मंत्री आणि त्यांचे सोबत ड्रायव्हर श्रीकांत ठोंबरे हे सकाळी 10:45 वा. धारूर बस स्थानकाच्या बाहेर घेवून जात होते.