बीड : मुर्ती घडविणारे आणि मुर्ती विक्रेत्यांना फिरत्या गाड्यावर घरोघर जावून त्यांचे मातीचे तयार केलेले बैल, श्री.गणेशाची मुर्ती विकण्यासाठी लॉकडाऊन कालावधीमध्ये दि. 22 ऑगस्टपर्यंत सुट देण्यात आली आहे. तथापी बीड, गेवराई, शिरूर, आष्टी, पाटोदा, माजलगाव, धारूर, वडवणी, केज, अंबाजोगाई, परळी या शहरातीलल अशा विक्रेत्यांनी आप-आपल्या शहरातील शासकिय रूग्णालयात दि. 17 ऑगस्ट रोजी दु. 3 वाजता स्वत:ची अँटीजेन टेस्ट करून घ्यावी, ज्या विक्रेत्यांना 17 ऑगस्ट रोजी टेस्ट करणे शक्य होणार नाही, त्यांनी 18 ऑगस्ट रोजी आपली टेस्ट करून घ्यावी, तर नागरिकांनी अशा विक्रेत्यांची अँटीजेन टेस्ट झाली असल्याबाबत खात्री करूनच बैल अथवा श्रीगणेशाची मृती खरेदी करावी, असे आवाहन अप्पर जिल्हा दंडाधिकारी प्रविण धरमकर यांनी केले आहे.