Site icon लोकाशा-बंब न्यूज

नराधम पिसाळले बीडमध्येही अकरा वर्षीय मुलीवर बलात्कार


बीड, दि. 20 (लोकाशा न्यूज) : बीड शहरातील पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीतील शिक्षक कॉलनीत राहणारे एका अकरा वर्षीय मुलीवर 46 वर्षीय इसमाने अतिप्रसंग केला. आज दिनांक 20 सप्टेंबर शुक्रवार रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास एक अल्पवयीन अकरा वर्षीय मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून जवळच राहणार्‍या एका 46 वर्षीय इसमाने स्वतःचे कपडे काढून मुलीवर अतिप्रसंग (बलात्कार) केला, मुलीने आरडाओरड केली असता आई व शेजार्‍यांनी घरात जाऊन पाहिले असता तो नराधम मुलीवर अतिप्रसंग केल्याचे निदर्शनास आले. मुलीच्या आईने पेठ बीड पोलीस ठाणे यांना माहिती दिली असता.पेठ बीड पोलीस ठाण्याचे कर्मचारी मोटे, शिकेतोड यांनी शिक्षक कॉलनी येथे जाऊन त्या नराधम इसमास ताब्यात घेऊन पेठ बीड पोलीस ठाण्यात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

Exit mobile version