Site icon लोकाशा-बंब न्यूज

मनेश क्षीरसागर बनावट नोटा तयार करणारा मास्टरमाईंड, बनावट नोटा तयार करण्यात सनी आठवलेंचा हात, बीड मध्ये चौदा ठिकाणी छापेमारी, बनावट नोटा तयार करणाऱ्यांच्या मुळापर्यंत बीड पोलिस पोहचले, झाडाझडतीत धारदार शस्त्र जप्त, तिघांवर गुन्हा दाखल


बीड,
मनेश क्षीरसागर हा बनावट नोटा तयार करणारा मास्टरमाईंड असल्याचे समोर आले आहे, तसेच बनावट नोटा तयार करण्यात सनी आठवलेंचाही हात आहे, या अनुषंगाने पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या आदेशाने बीड मध्ये चौदा ठिकाणी छापेमारी करत बनावट नोटा तयार करणाऱ्यांच्या मुळापर्यंत बीड पोलिस पोहचले आहेत, या झाडाझडतीत धारदार शस्त्र जप्त करून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे बीड बनावट नोटा तयार करणाऱ्यांचे मोठे रॅकेट उघडकीस येणार आहे.

बीड शहर पोलीस स्टेशन येथे बनावट नोटांप्रकरणी दाखल गुन्ह्याचे तपासात गुन्ह्यातील फरार आरोपी यांचा शोध घेत असतांना आणखी बनावट नोटा मिळून येण्याची शक्यता असल्याने तसेच अभिलेखावरील गुन्हेगारांवर वचक बसावा या उद्देशाने आज दिनांक 19/09/2024 रोजी बीड पोलीसांना मिळालेल्या गोपनिय माहीती‌द्वारे गुन्ह्यातील फरार आरोपी सनी आठवले व त्याचे साथीदार हे आणखी बनावट नोटा व बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगुन असल्याबाबत माहीती मिळाली होती. सदर माहीतीच्या आधारे पोलीस अधीक्षक श्री. अविनाश बारगळ यांच्या आदेशाने बीड शहरात सकाळी 09:00 ते दुपारी 14:00 वाजे दरम्यान कोम्बींग ऑपरेशन राबविण्यात आले. कोम्बींग ऑपरेशन वेळी नेमलेल्या विविध पथकां‌द्वारे बीड शहरात संशयीत सनी आठवले, त्याच्याशी संबंधीत व अभिलेखावरील इतर गुन्हेगारांच्या एकणु 14 ठिकाणी छापे टाकण्यात आले असता 1) महेश दिपक आठवले रा. माळीवेस, मंत्रीगल्ली, बीड याच्या घरझडतीमध्ये एक अवैध खंजीर असे शस्त्र मिळून आलेने त्यास शस्त्रासह ताब्यात घेण्यात आले आहे. 2) फरार संशयीत सनी शामराव आठवले रा. माळीवेस, मंत्रीगल्ली, बीड याचे घरझडतीमध्ये दोन्ही बाजुंनी धारदार असलेली एक कत्ती असे अवैध शस्त्रे मिळुन आले आहे. 3) फरार संशयीत मनेश प्रकाश क्षीरसागर रा. स्वराज्यनगर, बीड याच्या घरझडतीमध्ये अवैध एक चाकु व एक कुकरी असे शस्त्र मिळुन आले आहेत. तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय शस्त्र अधीनियम अन्वये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अविनाश बारगळ, अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विश्वांबर गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. शितलकुमार बल्लाळ, पोलीस निरीक्षक श्री. अशोक मुदीराज, पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी बंटेवाड पोलीस निरीक्षक श्री. मारुती खेडकर, सपोनि. नित्यानंद उबाळे, वर्षा व्हगाडे, बाबा राठोड, पोउपनिरी, रामेश्वर इंगळे, सानप, जोगदंड, सलमान शेख, रियाज शेख, शिंगणे, निकम आणि 92 पोलीस अंमलदार यांनी केली आहे.

Exit mobile version