Site icon लोकाशा-बंब न्यूज

मोमीन पुरा भागात धर्मगुरूकडून 11 वर्षीय मुलीवर बलात्कार, पेठ बीड पोलीस ठाण्यात नागरिकांची गर्दी; गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

बीड प्रतिनिधी

बीड शहरातील मोमीनपुरा भागात एका धर्मगुरूकडून अकरा वर्षीय मुलीवर गेल्या अनेक दिवसापासून बलात्कार होत असल्याची तक्रार मुलीने आई-वडिलांकडे केल्यानंतर ही घटना उघडकीस आली असून आई-वडिलांनी तात्काळ पेट बीड पोलीस ठाणे गाठले असून पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोमीनपुरा भागात चालणाऱ्या मखतब मध्ये शिकणाऱ्या एका अकरा वर्षीय मुलीवर एका धर्मगुरुकडून सतत बलात्कार केल्याची माहिती मुलींनी आपल्या आई-वडिलांना दिल्यानंतर आई-वडिलांनी थेट पोलीस स्टेशन गाठत या प्रकरणाची माहिती दिली पेठ बीड पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक करत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, पेठ बीड पोलीस ठाण्यात नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झालीआहे ,ही घटना निंदनीय असून समाजाला काळीमा फासणारी आहे.

Exit mobile version