Site icon लोकाशा-बंब न्यूज

IPS संतोष रस्तोगी यांच्या मुलीचा हॉस्टेलमध्ये आढळला मृतदेह

जळगाव, जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून कर्तव्य बजावलेले वरिष्ठ आयपीएस अधिकारी संतोष रस्तोगी यांच्या मुलीचा मृतदेह लखनऊच्या डॉ.राम मनोहर लोहिया विधी विद्यापीठात तिच्या वसतिगृहाच्या खोलीत आढळून आला. आशियाना पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लखनौमध्ये रविवार दि.१ सप्टेंबर रोजी १९ वर्षीय अंकिता रस्तोगी या विद्यार्थिनीचा मृतदेह लखनऊच्या डॉ.राम मनोहर लोहिया विधी विद्यापीठात तिच्या वसतिगृहाच्या खोलीत गूढ परिस्थितीत आढळून आला. अंकिता महाविद्यालयात विधी व कायदा (एलएलबी) पदवीचे शिक्षण घेत होती. मृत अनिका रस्तोगी हिला बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्तोगी तिच्या वसतिगृहाच्या खोलीचा दरवाजा उघडत नव्हती आणि नंतर जेव्हा खोलीचा दरवाजा तोडला गेला तेव्हा ती बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर पडली होती. अंकिता रस्तोगी एलएलबीच्या तिसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी होती. ती वरिष्ठ IPS अधिकारी तथा नवी दिल्लीतील राष्ट्रीय तपास संस्थेचे (NIA) महानिरीक्षक संतोष रस्तोगी यांची मुलगी होती.

आशियाना पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Exit mobile version