Site icon लोकाशा-बंब न्यूज

राजस्थानी मल्टीस्टेट घोटाळ्याप्रकरणी अभिषेक बियाणीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

परळी – परळीसह महाराष्ट्रात शाखांचे जाळे असलेल्या राजस्थानी मल्टीस्टेट अपहार प्रकरणी अध्यक्ष चंदूलाल बियाणी यांचे चिरंजीव अभिषेक बियाणी याला पोलिसांनी पहाटे अटक केली.

राजस्थानी मल्टीस्टेट मध्ये चंदूलाल बियाणी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जवळपास चारशे कोटी रुपयांचा अपहार केला. ठेवीदारांच्या पैशावर एश करणाऱ्या बियाणी यांच्याविरुद्ध अडीच तिनं महिन्यापूर्वी गुन्हे दाखल झाले, मात्र तेव्हापासून सगळे फरार असल्याचे पोलीस सांगत होते.

अभिषेक व इतरांनी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, मात्र तारीख पे तारीख सुरूच आहे. दरम्यान बियाणी यांचा मुलगा हा पुण्यात असल्याची आणि अटक केल्याशिवाय पर्याय नाही हे पोलिसांच्या लक्षात आल्याने अभिषेक ला अटक करण्यात आली.

Exit mobile version