गेवराई दि 28 ( वार्ताहार ) तालुक्यातील राक्षसभूवन परिसरात अनाधीकृत वाळू उपसा केला जातो यांची माहिती बीड स्थानिक गून्हे शाखेला मिळाल्यानंतर त्यांनी सदर ठिकाणी छापा मारला असता दहा केन्या ट्रॅक्टरसह ताब्यात घेतल्या असून या कार्यवाई अंदाजे 50 लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कार्यवाई ही ( दि 28 ऑगस्ट ) रोजी साडेदहाच्या सुमारास केली आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,बीड पोलिस अधीक्षक पदाचा कारभार पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी स्विकारल्या पासून अवैध वाळू वाहतूक व माफिया यांचे कंबरडे मोडले आहे त्या अंनूषगाने स्थानिक गून्हे शाखा व ईतर ठाणेदार यांना त्यांनी याविषयी कडक कार्यवाई करण्याच्या सुचना केल्या आहेत आज सकाळी साडेदहा वाजता बीड सथानिक गून्हे शाखेच्या पथकाला गेवराई तालुक्यातील राक्षसभूवन परिसरात अनाधीकृत वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाली तसेच त्यांनी गोदापात्रात छापा मारला व दहा ट्रॅक्टर केनीसह ताब्यात घेतले आहेत व या कार्यवाईत अंदाजे 50 लाखं रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या वाहनाना कागदपत्रे नाहीत अशी देखील चर्चा आहे सदरची कार्यवाई बीड पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ,अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर,पोलिस निरीक्षक उस्मान शेख,स्था गू शाखा,यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि मुरकूटे,एस आय जायभाये,पोह महेश जोगदंड,विकास वाघमारे,बाळू सानप,दत्ता घोडके यांनी केली आहे.
वाळू माफियांना एसपींचा दणका,राक्षसभूवन गोदापात्रात एलसीबीची छापेमारी, दहा ट्रॅक्टरसह केन्या ताब्यात, 50 लाखांचा मुद्देमाल जप्त
