Site icon लोकाशा-बंब न्यूज

जिल्ह्यातील 5280 महिला कामगारांची पंचमी सीईओंनी केली गोड, शालेय पोषण आहार कामगारांचे जून आणि जुलै महिण्याचे 2 कोटी 74 लाख रूपयांचे मानधन खात्यात केले वर्ग


बीड, दि. 10 (लोकाशा न्यूज) : जिल्ह्यातील 5280 शालेय पोषण आहार कामगारांची पंचमी सीईओ संगितादेवी पाटील यांनी गोड केली आहे. या कामगारांचे जून आणि जुलै या दोन महिण्याचे 2 कोटी 74 लाख रूपयांचे मानधन त्यांच्या खात्यात वर्ग केले आहेत. यामुळे जिल्ह्यातील कामगारांकडून आणि शालेय पोषण आहार संघटनेच्या वतीने सचिव डॉ.अशोक थोरात यांनी सीईओ आणि शिक्षणाधिकार्‍यांचे आभार मानले आहेत.
जिल्ह्यातील झेडपीच्या शाळांमध्ये 5280 महिला कामगार पोषण आहार शिजविण्याचे काम करतात, अत्यंत कमी मानधनावर हे कामगार आज काम करीत आहेत. त्यामुळे झेडपीच्या सीईओंकडून त्यांचे मानधन त्या त्या महिण्यात तात्काळ वितरीत केले जाते. जुन आणि जुलै या दोन्ही महिण्यातील जिल्ह्यातील या 5280 कामगारांचे मानधन सीईओ संगिता देवी पाटील यांनी पंचमीच्या दिवशी वितरीत केले आहे. शुक्रवारी मानधनाची रक्कम थेट कामगारांच्या खात्यात गेल्यामुळे त्यांची पंचमी गोड झाली आहे. याबद्दल सीईओ संगिता देवी पाटील आणि शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांचे कामगारांबरोबरच शालेय पोषण आहार संघटनेचे सचिव डॉ. अशोक थोरात यांनी आभार मानले आहेत.

मानधन खात्यात आल्याने कामगारांचा
पंचमीचा सण आनंदात झाला – डॉ. थोरात  
ऐन पंचमीच्या दिवशी शालेय पोषण आहार कामगारांचे 2 कोटी 74 लाखाचे मानधन त्यांच्या खात्यात आले आहे. सीईओ संगितादेवी पाटील आणि शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांनी जिल्ह्यातील शालेय पोषण आहार कामागारांची पंचमी गोड केली आहे. कारण या दोन महिण्याच्या मानधनामुळे कामगारांना पंचमीचा सण आनंदात साजरा करता आला आहे. याबद्दल सीईओंसह शिक्षणाधिकार्‍यांचे मी संघटनेच्या वतीने आभार मानतो, असे शालेय पोषण आहार कामगार संघटनेचे सचिव डॉ.अशोक थोरात यांनी म्हटले आहे.

Exit mobile version