Site icon लोकाशा-बंब न्यूज

ठाकरेंच्या सेनेला बीडमध्ये खिंडार, महिला आयोगाच्या सदस्या संगीता चव्हाण आणि युवा सेनेच्या दोन जिल्हा प्रमुखांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश, सुषमा अंधारे यांच्यावर गंभीर आरोप करत उद्धव ठाकरेंना ठोकला राम राम

बीड प्रतिनिधी – उद्धव ठाकरे च्या शिवसेनेला बीडमध्ये खिंडार पडली असून महिला आयोगाच्या सदस्य असलेल्या संगीता चव्हाण आणि युवा सेनेचे जिल्हाप्रमुख यांनी उद्धव ठाकरे ची साथ सोडली असून त्यांनी आता एकनाथ शिंदे च्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे

पक्ष सोडताना संगीता चव्हाण यांनी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर गंभीर स्वरूपाच्या आरोप केले आहेत त्यामध्ये पदासाठी सुषमा अंधारे पैसे घेतात आणि त्यांनी शिवसेना पक्ष संपवण्यासाठी कोणाची तरी सुपारी घेतल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय यापुढे शिंदे च्या शिवसेनेच्या कुठल्याही नेत्यावर जर आरोप केला तर चूक दिला जाईल असा कणखणी इशारा देखील संगीता चव्हाण यांनी सुषमा अंधारे यांना पक्ष सोडताना दिला आहे त्यामुळे येत्या काळात सुषमा अंधारे यांना रोखण्यासाठी संगीता चव्हाण या पुढे येणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप आणि सचिन मुलुक यांच्या उपस्थितीत हे प्रवेश झाले आहेत.

Exit mobile version