Site icon लोकाशा-बंब न्यूज

बीडचे तात्कालीन एसपी जी.श्रीधर आता पुणे शहरचे पोलिस उप आयुक्त


बीड, दि. 7 (लोकाशा न्यूज) : बीडचे तात्कालिन पोलिस अधीक्षक तथा हिंगोलीचे विद्यमान पोलिस अधीक्षक जी.श्रीधर यांचीही बुधवारी बदली करण्यात आली आहे. त्यानुसार त्यांच्याकडे आता पुणे शहर पोलिस उप आयुक्त पदाची नवी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जी. श्रीधर हे अत्यंत कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. त्यांनी बीड जिल्ह्यात सलग दोन वर्ष पोलिस अधीक्षक पदाची जबाबदारी चोखपणे संभाळलेली आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील त्यांची कारकिर्द प्रत्येकाच्या आठवणीत राहिलेली आहे. मागच्या दोन वर्षांपासून ते हिंगोलीचे पोलिस अधीक्षक होते, याही ठिकाणी त्यांनी आपल्या कर्तव्यातून अनेकांना न्याय देण्याचे काम केले आहे. आता नव्याने त्यांच्याकडे पुणे शहर पोलिस उप आयुक्त पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या नव्या ठिकाणीही ते अत्यंत चोखपणे कर्तव्य बजावून अनेकांना न्याय मिळवून देतील, असा विश्‍वास प्रत्येकाला आहे.

Exit mobile version