Site icon लोकाशा-बंब न्यूज

बनावट दूध बनविणाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका, तीन जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना पाठवून आष्टीत मारली रेड, २०० पोत्यापेक्षा अधिक पावडरचा साठा जप्त

आष्टी, बनावट दूध बनविणाऱ्यांना जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी मोठा दणका दिला आहे, बीड जिल्ह्यासह तीन जिल्ह्यातील अन्न औषध विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठवून पाठक यांनी
आष्टी तालुक्यातील आमिया टाकळी येथे ही रेड मारली आहे. यावेळी बनावट दुध बनविण्याचा मोठा साठा जप्त केला असून यामुळे आता भेसळयुक्त दुधाची विक्री अनेक किती ठिकाणी होते याचा तपास आता प्रशासन घेत आहे.

बीड जिल्ह्यात दुधाची होतं असलेली भेसळयुक्त विक्री आता चव्हाट्यावर येतं आहे.
या बनावट दूध विक्रीचा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी मागच्या तीन दिवसांपूर्वी एक मोहीम आखली होती, त्यानुसार त्यांनी या कामासाठी बीड आणि अन्य दोन जिल्ह्यातील अन्न औषधं विभागातील अधिकाऱ्यांची टीम नेमली होती, त्यानुसार या टीमने
आष्टी तालुक्यातील टाकळी अमिया येथे छापेमारी करत २०० पोत्यापेक्षा अधिक पावडरचा साठा जप्त केल्याचे कळते. शनिवारी रात्रीपासून हा साठा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु आहे.

मागच्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यात बनावट दूध विक्रीचा धंदा जोरात सुरु आहे. याबाबत माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी टीम तयार करून टाकळी अमिया येथे छापा मारला. यात २०० गोण्या पावडरच्या साठ्याच्या आढळून आल्या असून अजूनही साठा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. शनिवार रात्रीपासून पोलीस आणि अन्न प्रशासन घटनास्थळी तळ ठोकून आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा साठा अंबादास चौधरी यांचा असल्याचे कळते.याप्रकारणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Exit mobile version