Site icon लोकाशा-बंब न्यूज

महाराष्ट्रात रेल्वे सुसाट, बीड रेल्वे मार्गासाठी 275 कोटींची तरतूद, दहा वर्षातील आमच्या सातत्यपुर्ण पाठपुराव्याचे हे यश, खा. प्रीतमताईंनी मानले, पंतप्रधान, केंद्रीय अर्थमंत्री आणि रेल्वे मंत्र्यांचे आभार


बीड, दि. 24 (लोकाशा न्यूज) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी  23 जुलै 2024 रोजी     केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील विविध रेल्वे मार्गासाठी 15 हजार 940 कोटींची तरतूद केली आहे. यामध्ये नगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी 275 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. दहा वर्षातील आमच्या सातत्यपुर्ण पाठपुराव्याचे हे यश असल्याचे जिल्ह्याच्या तात्कालिन खा. प्रीतमताई मुंडे यांनी म्हटले आहे. याअनुषंगानेच त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि रेल्वे मंत्री अश्‍विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत.
बीड जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा असलेला नगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्प पुर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने वेळोवेळी आर्थिक तरतूद करून प्रकल्पाला गती देण्याचे काम केले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात देखील केंद्र सरकारने बीड रेल्वे प्रकल्पाकरीता दोनशे पंचाहत्तर कोटी रूपयांची आर्थिक तरतूद केली आहे. या रेल्वे प्रकल्पासाठी मागील दहा वर्षांपासून सुरू असलेल्या माझ्या सातत्यपुर्ण पाठपुराव्याला केंद्र सरकारने नेहमीच सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, आज पुन्हा एकदा केंद्र सरकारची आपल्या रेल्वेसाठी असलेल्या कटीबध्दतेची प्रचिती आली. आम्हा बीड जिल्हावासियांचे रेल्वेचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी वेळोवेळी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांचे खूप खूप आभार असे जिल्ह्याच्या तात्कालिन खा. प्रीतमताई मुंडे यांनी म्हटले आहे.

Exit mobile version