बीड, दि.16 (लोकाशा न्युज) ः बीड शहराला पाणी पुरवठा करणारे बिंदूसरा धरण ओव्हरफ्लोच्या उंबरठ्यावर येवून ठेपले आहे. शनिवारी दि.15 ऑगस्ट रोजी रात्रीच्या दरम्यान धरण तब्बल 98 टक्के भरले आहे. धरण कोणत्याही क्षणी भरण्याची शक्यता असल्याने नदीपात्रा लगतच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचा ईशारा नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागर यांनी दिला आहे. बीड शहराला पाणी पुरवठा करणारे पाली येथील बिंदुसरा धरणाची पाणी पातळी 98 टक्के झाली असून जर पाऊस झाला तर लवकरच धरण ओव्हरफ्लो होऊ शकते. त्यामुळे बीड शहरातील नदी काठी असलेल्या नागरिकांनी तात्काळ स्थलांतर करावे व सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.