Site icon लोकाशा-बंब न्यूज

पंकजाताई मुंडे यांनी घेतली केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांची भेट, परळी व बीड जिल्ह्यातील रेल्वेच्या समस्या लवकरच मार्गी लावण्यासाठी रेल्वेमंत्री सकारात्मक

मुंबई।दिनांक १९।
भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य आ. पंकजाताई मुंडे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन परळी व बीड जिल्ह्यातील रेल्वेच्या समस्या त्यांचेसमोर मांडल्या. परळीतील जमीन अधिग्रहणासह जिल्ह्यातील रेल्वेविषयक प्रश्नांची लवकरच सोडवणूक करू असं आश्वासन त्यांनी दिलं. जिल्हयाचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे हे देखील यावेळी उपस्थित होते.

भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव गुरूवारी मुंबईत आले होते. भाजपच्या प्रदेश कार्यालयात आ. पंकजाताई मुंडे, पालकमंत्री धनंजय मुंडे व परळीच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली परळी येथील रेल्वेच्या जमीन अधिग्रहणासह विविध मागण्यांचे निवेदन यावेळी त्यांना देण्यात आले. पंकजाताई मुंडे व धनंजय मुंडे यांनी सविस्तरपणे सगळे विषय त्यांचेसमोर मांडले.
या सर्व मागण्यांवर योग्य तो विचार करून परळी वैजनाथ, बीड येथील रेल्वेचे रखडलेले प्रश्न त्वरीत मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्नशील आहे, असा विश्वास केंद्रीय रेल्वेमंत्री श्री.अश्विनी वैष्णवजी यांनी यावेळी दिला. दरम्यान, या भेटीत सुरवातीला पंकजाताई मुंडे यांनी श्री.अश्विनी वैष्णव यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत निरोगी आणि उदंड दीर्घायुष्य लाभावे अशी सदिच्छा व्यक्त केली.

Exit mobile version