Site icon लोकाशा-बंब न्यूज

घरफोडीतील साडे चार लाखाचा मुद्देमाल फिर्यादीस केला परत, बीड शहर पोलिसांची कामगिरी.


    बीड, दि. 17 (लोकाशा न्यूज) : घरफोडीतील साडे चार लाखांचा मुद्देमाल फिर्यादीस परत करण्यात आला आहे. ही कामगिरी बीड शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ आणि त्यांच्या टिमने केली आहे.
दि.21 मे 24 रोजी  फिर्यादी मोहम्मद शकीद्दीन खाजा मोईनुद्दीन (रा. कागदी दरवाजा खासबाग, देवी रोड , बीड) हे घरी नसताना त्यांच्या घरात घुसून अज्ञात आरोपीने कपाटात ठेवलेले साडे चार लाख रुपये किमतीचे सोन्याचे बिस्किट कपाट तोडून चोरून नेले होते.  परंतु बीड शहरच्या डीबी पथकाने हा गुन्हा 24 तासाच्या आत उघडकीस आणून यातील आरोपी सय्यद रिहान सय्यद अब्दुल रजाक राहणार कागदी दरवाजा या तात्काळ अटक केले होते . यातील मुद्देमाल सोन्याचे बिस्किट त्यांनी हस्तगत केले होते ते बिस्किट बुधवारी रोजी फिर्यादीस सन्मानाने परत केले आहे.  यातून परिसरातील लोकांनी पोलिसांच्या कामगिरीबद्दल कौतुक व्यक्त केले आहे. सदरील कामगिरी पोलीस अधीक्षक श्री नंदकुमार ठाकूर,  अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वंभर गोल्डे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबा राठोड, पोलीस अंमलदार बाळासाहेब शिरसाट, मनोज परजणे, अशपाक सय्यद, सुशील पवार यांनी बालाजी मुळे यांनी पार पाडली आहे.

Exit mobile version