Site icon लोकाशा-बंब न्यूज

बा विठ्ठला, पडूदे जोरदार पाऊस आणि येऊ दे माझ्या बळीराजाची सुगी जोरात – धनंजय मुंडेंचे विठ्ठलाला साकडे, आषाढी एकादशीनिमित्त धनंजय मुंडे यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई (दि. 16) – बा विठ्ठला, यंदाच्या हंगामात पडू दे जोरदार पाऊस आणि माझ्या शेतकरी-बळीराजाची सुगी यंदा जोरदार येऊ दे… असे साकडे आषाढी एकादशीच्या निमित्ताने राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी पंढरीच्या पांडुरंगाला घातले आहे.

राज्यात आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलमय वातावरण असून, वारकरी पंढरीत दाखल झाले आहेत. राज्यभरात ठिकठिकाणी आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल मंदिरांमध्ये भक्तांच्या रांगा आजपासूनच पाहायला मिळत आहेत.

या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सर्व भाविकांना व वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या असून, यावर्षी भरपूर पाऊस पडून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू दे, असे साकडे पंढरीच्या पांडुरंगाला घातले आहे.

Exit mobile version