Site icon लोकाशा-बंब न्यूज

बिग ब्रेकिंग! पुन्हा राजकीय भूकंप?भुजबळानंतर सुनेत्रा पवार यांनी शरद पवारांची घेतली भेट


मुंबई, आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. काल राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सिल्वर ओकवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन बंद दाराआड तब्बल दीडतास चर्चा केली. तर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांनीदेखील ज्येष्ठ नेते पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांनी मोदीबागेत ज्येष्ठ नेते पवार यांची भेट घेतली आहे. सुनेत्रा पवार तासभरापेक्षा जास्त वेळ मोदी बागेत होत्या. ज्येष्ठ नेते पवार यांच्याशी एक तास चर्चा केल्यानंतर सुनत्रा पवार मोदीबागेतून रवाना झाल्या आहेत. तर दुसरीकडे येत्या काही दिवसात पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडतील, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर सुनेत्रा आणि शरद पवार यांची पहिल्यांदा भेट झाली आहे. त्यामुळे या भेटीदरम्यान काय चर्चा झाली, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. राष्ट्रवादी फुटल्यानंतर लोकसभा निवडणुकीत अजितदादा गटाने सुनेत्रा पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवला होता. संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या या निवडणुकीत सुनेत्रा यांचा पराभव झाला होता.

Exit mobile version