Site icon लोकाशा-बंब न्यूज

डॉ.अशोक थोरात यांना पितृशोक

प्रतिनिधी | केज
दि.१५ : तालुक्यातील कुंबेफळ येथील आरोग्य विभागाचे मुंबईचे सहायक संचालक डॉ.अशोक थोरात यांचे वडील संपतराव किसनराव थोरात यांचे लातूर येथे सोमवारी (दि.१५) सायंकाळी ९ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.

मृत्यूसमयी त्यांचे वय ८२ वर्षे होते. त्यांनी मृद व जलसंधारण विभागात पर्यवेक्षक पदावर काम केले होते. त्यांच्या पश्चात डॉ.अशोक थोरात, अजित थोरात ही दोन मुले, डॉ.प्रतिभा थोरात, जि.प.च्या माजी सदस्या डॉ.योगिनी थोरात या सुना, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. दरम्यान, अंत्यविधी आज (दि.१६) सकाळी १०:३० वाजता कुंबेफळ येथील शेतात होणार आहे. थोरात कुटुंबीयांच्या दुःखात दैनिक लोकाशा परिवार सहभागी आहे.

Exit mobile version