Site icon लोकाशा-बंब न्यूज

जिल्ह्यातील पाच खाजगी रुग्णालयात होणार कोरोनाचे उपचार

बीड दि. 15 : कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे दिवसेंदिवस बीड जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढत आहे. त्यामुळे रुग्णसेवेमध्ये अधिकाधिक सुसूत्रता येण्यासाठी शासकीय यंत्रणेसोबतच खासगी रुग्णालयांना सहभागी करून घेण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी घेतला आहे. त्यानुसार कोरोना रुग्णांवर उपचारासाठी बीड जिल्ह्यातील आणखी पाच खासगी रुग्णालये उपलब्ध साधनसामुग्री आणि मनुष्यबळासह अधिगृहित करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
अधिगृहित करण्यात आलेल्या रुग्णालयात बीडचे स्पंदन हॉस्पिटल, ‌पॅराडाईज हॉस्पिटल, अंबाजोगाईचे घुगे हॉस्पिटल, परळीचे मुंडे हॉस्पिटल आणि माजलगावचे यशवंत हॉस्पिटल या खासगी रुग्णालयांचा समावेश आहे. या रुग्णालयातील सर्व खाटांना रविवार (दि.१६) पर्यंत सेन्ट्रल ऑक्सिजन सिस्टीम कार्यान्वित करून घ्यावयाचे असून सोमवारपासून रुग्णांवर उपचार करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. आदेशाचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कार्यवाही करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.

Exit mobile version