Site icon लोकाशा-बंब न्यूज

जिल्ह्यातील महिलांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा लाभ उचलावा: जिल्हाधिकारी अविनाश पाठक, योजनेचा लाभ पात्र महिलांपर्यंत पोहोचावा यासाठी तालुक्यांमध्ये केला दौरा

बीड, दि. 14: बीड जिल्ह्यात महिलांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा लाभ मिळावा, यासाठी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये दौरा करून थेट महिला पर्यंत पोहोचून योजनेची माहिती दिली.

शनिवारी सकाळपासून जिल्हाधिकारी श्री पाठक यांनी जिल्ह्यातील गेवराई, वडवणी, पाटोदा, आंबेजोगाई, आष्टी आणि केज या तालुक्यातील नगरपंचायतीला, तसेच तालुक्यातील काही गावांमध्ये दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबतची माहिती दिली.

या योजनेअंतर्गत लागणाऱ्या कागदपत्र तसेच कोणाच्या माध्यमातून योजनेचा लाभ घेता येईल याबद्दल सांगितले. या योजनेचा लाभ पात्र महिलांनी उचलावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.
त्यांच्या या दौऱ्यामध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता देवी पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर केकान तसेच दौरा केलेल्या तालुक्यातील तहसीलदार त्यांच्यासह संबंधित विभागातील अधिकारी कर्मचारी आणि लाभार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

गेवराई तालुक्यातील मादळमोही, शिरूर तालुक्यातील तिंतरवणी, पाटोदा तालुक्यातील अमळनेर , पाटोदा नगरपंचायत, आष्टी नगरपंचायत, आष्टी तालुक्यातील मुर्शिदपूर, बीड तालुक्यातील लिंबागणेश, नेकनूर , केज नगरपंचायत, तालुक्यातील होळ, आंबेजोगाई नगरपंचायत, आंबेजोगाई तालुक्यातील पिंपळगाव, पुस, बदलापूर, लोखंडी, सावरगाव व हातोला या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण याबाबत समक्ष भेटी देऊन या योजनेबाबतची माहिती दिली.
पात्र महिलांचा वयोगट 21 ते 65 असून या वयोगटातील लाभार्थ्यांची फॉर्म भरून घेणे व प्रत्यक्षात मार्गदर्शन करून संबंधित योजना बीड जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व ठिकाणी आढावा घेऊन या विषयी मार्गदर्शन केले.

यावेळी सर्व ठिकाणी ग्रामपंचायतचे सरपंच ग्रामसेवक अंगणवाडी पर्यवेक्षिका अंगणवाडी अंगणवाडी ताई बालविकास प्रकल्प अधिकारी संबंधित तालुक्याचे तहसीलदार उपविभागीय अधिकारी आष्टी मध्ये माजी आमदार सुरेश धस सर्व नगरपंचायत नगराध्यक्ष व संबंधित गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित योजना ही बीड जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे राबविणेसाठी सर्वांनी सहकार्य करून ही योजना प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यात यावी, याबाबत माननीय जिल्हाधिकारी यांनी आव्हान केले व या योजनेमध्ये कुठलाही लाभार्थी वंचित राहणार नाही अशा प्रशासकीय सूचना संबंधित यंत्रणेला अशी पाठव यांनी यावेळी दिल्या.

Exit mobile version