Site icon लोकाशा-बंब न्यूज

अवैधपणे मालमत्ता कमावणाऱ्या अधिकाऱ्यांना बीड एसीबीचा दणका, अंबाजोगाईचे तात्कालीन कार्यकारी अभियंता संजयकुमार कोकणेकडे तीन कोटी दोन लाखांची मालमत्ता, ज्ञात उत्पन्न स्त्रोतापेक्षा 238.84 टक्के जास्त अपसंपदा आढळून आल्याने कोकणेसह त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल, गुन्ह्यात कोकणेला मुंबईतून केली अटक


बीड, अंबाजोगाईचे तात्कालीन कार्यकारी अभियंता संजयकुमार कोकणे यांच्याकडे तीन कोटी दोन लाख ६४ हजार १४१ रुपयांची मालमत्ता आढळून आली आहे, वास्तविकता ज्ञात उत्पन्न स्त्रोतापेक्षा 238.84 टक्के जास्त अपसंपदा आढळून आल्याने बीड एसीबीने कोकणेसह त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल केला आहे, एवढेच नव्हे तर कोकनेला मुंबई येथून अटक करण्यात आली आहे. दरम्यान अवैधपणे मालमत्ता मिळवणाऱ्या अधिकाऱ्यांचे धाबे बीड एसीबीने केलेल्या या कारवाईमुळे दणाणून गेली आहेत.

कारवाईची हकीगत
अपसंपदा कारवाई
▶️ युनिट – बीड
▶️ तक्रारदार- श्री. शंकर किसनराव शिंदे पोलीस उप अधीक्षक,नेमणुक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग. बीड.
▶️ गैरअर्जदार – 1) श्री.संजयकुमार शशिकांत कोकने.वय 51 वर्ष तत्कालीन कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अंबाजोगाई जि. बीड.(वर्ग 1) सध्या कार्यकारी अभियंता विकास विभाग क्रमांक चार अंधेरी मुंबई,(R.D.D.-4 ) रा.पाखल रोड.नाशिक.
2) सौ.ज्योती संजकुमार कोकणे रा.नाशिक
▶️ अपसंपदा रक्कम-
30264141.08/- रुपये (तीन कोटी दोन लाख 64 हजार एकशे एकेचाळीस पॉईंट झिरो आठ रुपये.) म्हणजेच ज्ञात उत्पन्न स्रोतापेक्षा सुमारे २३८.८४ टक्के जास्त अपसंपदा
▶️ * हकीगत*
आरोपी लोकसेवक श्री संजयकुमार शशिकांत कोकणे तत्कालीन कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग आंबेजोगाई
(वर्ग १ ) रा. पखाल रोड नाशिक यांचे विरुद्ध दिनांक 22/02/2022 रोजी सापळा कारवाई नंतर पो.स्टे. अंबाजोगाई शहर येथे गु.र.नं.274/2022 अन्वये कलम 7, भ्र.प्र.अधि.1988 अन्वये दाखल गुन्हयाचे अनुषंगाने त्यांचे मालमत्तेची उघड चौकशी करण्याचे आदेश प्राप्त झाले होते.
लोकसेवक यांच्या मालमत्तेच्या उघड चौकशी दरम्यान परीक्षण कालावधीमध्ये म्हणजे (दि.01/09/2010 ते दि.22/06/2022) चे दरम्यान लोकसेवक श्री. संजयकुमार शशिकांत कोकणे तत्कालीन कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई ( वर्ग १) यांनी त्यांचे सेवा कालावधीतील परिक्षण कालावधी दरम्यान सर्व ज्ञात व कायदेशीर मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा रुपये 302 64 141.08 रुपये म्हणजेच(238.84 टक्के) रकमेची अपसंपदा संपादित केली आहे. एकूण अपसंपदे पैकी श्री संजयकुमार शशिकांत कोकणे यांची पत्नी सौ. ज्योती संजय कुमार कोकणे यांनी सुमारे ,1,12,60,000/-( एक कोटी बारा लाख साठ हजार रुपयाची) मालमत्ता स्वतःच्या नावे धारण करून लोकसेवक श्री संजयकुमार कोकणे यांना अपसंपदा संपादित करण्यासाठी सहाय्य केल्याचे (प्रोत्साहन दिल्याचे )उघड चौकशीत निष्पन्न झाले म्हणून लोकसेवक श्री संजयकुमार शशिकांत कोकणे तत्कालीन कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग आंबेजोगाई जिल्हा बीड,(वर्ग 1) सध्या कार्यकारी अभियंता विकास विभाग क्रमांक चार अंधेरी मुंबई,(R.D.D.-4 )मूळ रा. येवला तालुका येवला जि. नाशिक ह. मु. पखाल रोड वडाळा नाशिक यांचे विरुद्ध कलम 13 (1)(ब) व ,13 (2)भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 व लोकसेवक श्री संजयकुमार कोकणे यांना हेतूपुरस्सर व बेकायदेशीरपणे अपसंपदा मिळवण्यासाठी प्रोत्साहन दिले म्हणून सौ ज्योती संजय कुमार कोकणे यांचे विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन 1988 (संशोधन ,2018) चे कलम 12 प्रमाणे. आरोपी लोकसेवक संजय कुमार कोकणे व त्यांची पत्नी सौ ज्योती कोकने यांचे विरुद्ध
पो.स्टे. अंबाजोगाई शहर येथे गु.र.नं.-294 /2024 कलम 13(1)(ब) व 13(2),12 भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
▶️तपास अधिकारी
श्री युनुस शेख पोलीस निरीक्षक ला. प्र.वी. बीड
मोबा. 9765000784

▶️मार्गदर्शक- संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर.मो.न.
9923023361

श्री.मुकुंद अघाव , अपर पोलिस अधीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर
मो. न. 9881460103

श्री. शंकर शिंदे. पोलीस उपअधीक्षक ला.प्र.वि. बीड.
मो.न. 9355100100.
▶️ *आलोसे यांचे सक्षम अधिकारी
मा.अव्वर सचिव, महसुल व वने (मुद्रांक) विभाग, मंत्रालय, मुंबई.
*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छात्रपती संभाजीनगर
*टोल फ्री 1064.

Exit mobile version