बीड : मागील काही दिवस बीड जिल्ह्यात कोरोनाने शतक मारले, कोरोनाची ही शतकी खेळी मागच्या दोन दिवसांपासून कमी झाली आहे, आता कोरोनामुक्त रुग्णांची शतकी खेळी सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे, काल जिल्ह्यातून 106 रुग्ण कोरोना मुक्त झाले होते, तर आज आणखी जिल्हातील 123 रुग्ण कोरोनामुक्त होणार आहेत, यामध्ये बीड आणि परळी प्रत्येकी 31, गेवराई आणि केज प्रत्येकी 14, माजलगाव 16, वडवणी 2, धारूर 2, अंबाजोगाई येथील 13 रुग्णांचा समावेश आहे, जिल्ह्यात आत्तापर्यंत 2417 रुग्ण कोरोना बाधित सापडलेले आहेत, त्यापैकी 1089 रुग्ण बरे होऊन ते घरी परतलेले आहेत, 64 जण मयत तर 1264 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, सर्वात विशेष म्हणजे कोरोनामुक्तीचा आकडा एक हजाराच्या पुढे सरकला आहे, ही जिल्ह्यासाठी मोठी दिलासादायक बातमी आहे.