Site icon लोकाशा-बंब न्यूज

परळी पर्यंत धावणारी रेल्वे बघण्यासाठी दादा हवे होते, जेष्ठ संपादक नामदेवराव क्षीरसागर यांना श्रद्धांजली वाहताना डॉ. प्रितमताई मुंडे यांनी व्यक्त केल्या शोकभावना


बीड । दि ०१ । दैनिक चंपावतीपत्रचे जेष्ठ संपादक नामदेवराव दादा क्षीरसागर यांचे आज ( सोमवार ) दुःखद निधन झाले आहे. जिल्ह्याच्या माजी खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांनी नामदेवराव क्षीरसागर यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. नगर पासून परळीपर्यंत धावणारी रेल्वे बघण्यासाठी दादा असायला हवे होते’ अशा शोकभावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

आपल्या जिल्ह्यातील नामांकित वृत्तपत्र दैनिक चंपावतीचे संपादक आणि सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे आदरणीय नामदेवराव दादा क्षीरसागर यांचे निधन झाल्याचे वृत्त ऐकून स्तब्ध आहे. बीड जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर सामाजिक चळवळ उभारणारे मितभाषी व्यक्तिमत्व असा नामदेवराव क्षीरसागर यांचा नावलौकिक होता. आपल्या जिव्हाळ्याच्या नगर-बीड-परळी रेल्वेसाठी त्यांनी उभारलेले जनआंदोलन रेल्वे प्रकल्पाला गती देण्यासाठी महत्वपूर्ण ठरले होते. आज जिल्ह्यात रेल्वे धावत आहे, लवकरच रेल्वे परळी पर्यंत धावणार आहे, परंतु दादा आपल्यात नाहीत. परळीपर्यंत धावणारी रेल्वे बघण्यासाठी दादा असायला हवे होते. अशा भावना डॉ. प्रितमताई मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत.

Exit mobile version