बीड दि.२२(प्रतिनिधी):बीड जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांना नियुक्ती देण्यात आली आहे.
पोलीस दलात एलसीबी अर्थात स्थानिक गुन्हे शाखा ही महत्वाची मानली जाते. बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेची जबाबदारी पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्याकडे होती.
बुधवारी पोलीस अधीक्षकांनी एलसीबीमध्ये फेरबदल केले असून संतोष साबळे यांची बदली केली आहे, आता एलसीबीची धुरा परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्याकडे देण्यात आली असून त्यांनी या पदाची सूत्रे स्वीकारली आहेत.
