Site icon लोकाशा-बंब न्यूज

जिल्ह्यात आणखी 98 जण कोरोना पॉझिटिव्ह


बीड : बीड जिल्ह्यात शुक्रवारी पुन्हा कोरोनाची गती वाढली आहे, रात्री उशिरा आलेल्या अहवालात 614 पैकी 98 जण पॉझिटिव्ह तर 507 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, नऊ जणांचे रेपोर्ट अनिर्णित राहिले आहेत, पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये बीड 33, केज 13, परळी 11,अंबाजोगाई 15, आष्टी 6, माजलगाव 10, गेवराई 1, शिरूर 2,वडवणी 3, धारूर 3 आणि पाटोदा येथील एका रुग्णांचा समावेश आहे, तर दिवसभरात 106 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

आ. सुरेश धसांचा अहवाल निगेटिव्ह
पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे आ. सुरेश धस हे होम कॉरंटाईन झालेले आहेत, रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये त्यांच्यासह त्यांच्या कुटूंबातील अन्य सदस्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Exit mobile version