Site icon लोकाशा-बंब न्यूज

लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाची मायबाप सरकारने गांभिर्याने दखल घ्यावी – पंकजाताई मुंडे यांची मागणी

बीड ।दिनांक १७।
ओबीसी नेते लक्ष्मण हाके व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केलेल्या उपोषणाची मायबाप सरकारने गांभिर्याने दखल घ्यावी अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केली आहे.

मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीला धक्का लागणार नाही याची लेखी हमी सरकारने द्यावी या मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून लक्ष्मण हाके व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे.

यासंदर्भात पंकजाताई मुंडे यांनी ट्विट केलं आहे. त्या म्हणाल्या,
प्रा. लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी उपोषणाला बसले आहेत. पाणी देखील सोडले आहे.पाणी सोडल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे.शासनाची भूमिका माय-बापाची असावी. सर्व वर्गाना, सर्व आंदोलनांना सारखीच वागणूक मिळावी. समान न्यायाची अपेक्षा मायबाप सरकारकडून असते. यांच्या उपोषणाकडे गांभीर्याने पहावे असं त्यांनी म्हटलं आहे.
••••

Exit mobile version