बीड, दि. 12 (लोकाशा न्यूज) : जिल्ह्यात सामाजिक सलोखा आबाधीत रहावा, याकरिता आज दि. 13 जून रोजी बीडमध्ये सदभावना रॅली काढण्यात येणार आहे, तरी या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केले आहे.
बीड जिल्ह्यात सध्या सुरु असलेला जातीय तणाव तसेच सोशल मिडीयावरुन समाजकंटक व्यक्तीकडुन करण्यात येणार्या आक्षेपार्ह पोस्ट यामुळे जिल्हयातील सामाजिक व जातीय सलोख्याचे वातावरण बिघडल्यामुळे बीड जिल्ह्यात सर्व जातीय, धर्मीय सांप्रदायिक सदभाव कायम रहावा, जिल्हयातील सामाजिक सलोख्याचे वातावरण अबाधित रहावे, जिल्हयात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी यासाठी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी बीड शहरातील लोकांचे सामाजिक सलोखा जोपसण्यासाठी त्यांच्यामध्ये जनजागृती होवुन जिल्ह्यातील सामाजिक सौहार्द कायम रहावे या करीता जिल्ह्यातील सर्व शांतताप्रेमी नागरीक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, वकील, स्वयंसेवी संस्था, महिला संघटना, यांना आवहान करण्यात येते की, दि.13 जून 2024 रोजी सकाळी 9.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी रॅलीसाठी एकत्रित जमुन छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक अशी सदभावना रॅलीमध्ये सामील होवुन जिल्ह्यातील सामाजिक सलोखा व शांतता राखण्याकामी आपले योगदान द्यावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केले आहे.
सामाजिक सलोख्यासाठी सकाळी बीडमध्ये निघणार सदभावना रॅली, रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांचे आवाहन
