Site icon लोकाशा-बंब न्यूज

पंकजाताईंमुळे गडकरींनी जिल्ह्याच्या विकासाचे पालकत्व स्विकारले ! ताईंच्या एका पत्रावर मी बीड जिल्ह्यासाठी दहा हजार कोटी दिले, माजलगावच्या जाहिर सभेत जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांची गडकरींनी यादीच वाचून दाखविली, तुम्ही पंकजाला खासदार करा, मोदीजी आणि मी डबल इंजिन लावून बीड जिल्हा विकास कामात देशात नंबर एकचा करू, पंकजा केवळ मुंडे साहेबांची मुलगी म्हणून नाही तर तिचे कर्तृत्व आणि नेतृत्व तेवढेच मोठे असल्याने जिल्ह्याचा आणि राज्याचा विकास करेल


बीड, दि. 10 (लोकाशा न्यूज) : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे नेतृत्व हिमालयाच्या उंचीप्रमाणे होते, आज त्यांच्या पावलावर पाऊल ठेवूनच त्यांची कन्या पंकजाताई मुंडे या काम करीत आहेत, ताईंचे नेतृत्वही बीड जिल्ह्यासह राज्याला पुढे घेवून जाणारेच आहे. त्याअनुषंगानेच विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून पुढे चालणारे देशाचे रोडकरी म्हणजेच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींही पंकजाताईंमुळे बीड जिल्ह्याच्या विकासाचे पालकत्व स्विकारले आहे. त्याअनुषंगानेच पंकजाताईंच्या प्रचारासाठी माजलगावच्या मोंढा मैदानावर गडकरींनी जाहीर सभा घेतली. त्यात बोलताना पंकजाला तुम्ही खासदार करा, या जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी स्वत: घेत पालकत्व स्वीकारतो. विकसाच्या प्रक्रियेत बीड जिल्हा देशात नंबर एकचा करून दाखवू हे सांगताना पंकजा केवळ स्व. गोपीनाथ मुंडेची मुलगी म्हणून नव्हे तर तिने राजकारणात आपले कर्तुत्व आणि नेतृत्व सिद्ध करू दाखवले. मोदीजी आणि मी स्वत: डबल इंजिनच्या रूपाने तिच्या पाठीमागे खंबीर पणे उभा राहू हे सांगताना तुम्ही पंकजाताईला दिल्लीला पाठवले तर जिल्ह्यासह राज्याच्या विकासाची ललकार बनवू शकते, कारण विकासासाठी सत्ते सोबत संघर्ष करण्यासाठी तिच्यात क्षमता आहे. राजकारणात माणूस जातीने नाही तर गुणाने मोठा होतो हे सांगताना छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन काम करतो. जो करेगा जात की बात, उसको पडेगा भारी लात असे सांगत त्यांनी स्व. गोपीनाथराव मुंडे हे खर्‍या अर्थाने सामान्य जनतेचे नेते होते. मुंडे- महाजनामुळे राज्यात भाजपाचा विस्तार झाला. माझ्याही राजकीय आयुष्यात त्यांचे मार्गदर्शन लाभल्याचे आवर्जून सांगितले.
आपल्या विस्तारीत भाषणात बोलताना सुरवातीलाच गडकरी म्हणाले कॉँग्रेसने देशात 60 वर्ष व्यवस्था चालवताना गरीबी हटवाचा नुसता नारा दिला. पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी वीस कलमी कार्यक्रम हाती घेतल्याचे सांगत देशातील सामान्य जनतेला विकासापासून वंचित ठेवले. मात्र अवघ्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉँग्रेसने जे 60 वर्षात केले नाही, ते करून दाखवताना सबका साथ सबका विकास सर्व स्तरावर सर्वांगीण विकास करताना या प्रक्रियेत गरीब माणसाला आणून सोडले. देशाची प्रगती खर्‍या अर्थाने यांच्या काळात झाली. कदाचित जास्तीचा विकास केला म्हणूच इंडि आघाडीवाले आमच्यावर बेताल आरोप करतात असे ते म्हणाले. बीड जिल्ह्यातल्या रस्ते विकासावर मी बोलणार नाही कारण आम्ही काय काम केले हा अनुभव तुम्ही घेतलाच असल्याचे सांगत त्यांनी खासदार प्रीतमताई यांनी पुढाकार घेतलेल्या पंकजाताईच्या एका पत्रावर जिल्ह्यातील दहा हजार कोटी रुपये खर्चाच्या रस्ते विकास कामाला मंजूरी दिल्याचे सांगितले. कामाची यादी वाचुंन दाखवताना त्यांनी बीडच्या शिवाजी चौक ते बार्शी नाका सुमारे पाच कोटी रुपये, आष्टी ते अहमदनगर 50 किमीसाठी 640 कोटी रुपये, पोहणेर सीरसाळा 25 कोटी, धारूर आडस 17 किमी, परळी सिरसाळा पांगरी नदीवर मोठा पूल आणि वॉटर स्टोरेज, तर माजलगाव केज धारूर रस्ता खराब झाला. तो गुत्तेदारांमार्फत दुरुस्ती करून घेण्याची हमी दिली. सीआरएम योजने अंतर्गत करोडो रुपये दिल्याचे त्यांनी सांगितले. बीड जिल्हा विकासाची मी केवळ गॅरंटी नाही तर पालकत्व घेतो. तुम्ही पंकजाताईला मतदान करून दिल्लीला पाठवा. आपला जिल्हा देशात विकासाच्या बाबतीत नंबर एकचा बनवल्या शिवाय राहणार नाही हे सांगताना पंकजा माझी मुलगी असल्याचा आवर्जून उल्लेख त्यांनी केला. राजकारणात जाती पातीचे प्रयोग समाजासाठी घातक ठरू शकतात. नेतृत्वाच्या अंगी असलेले गुण आणि कर्तुत्व हा विचार मतदारांनी करायला हवा. गोपीनाथराव मुंडेची आठवण काढत त्यांनी माझ्या राजकीय जीवनात त्यांचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगितले. रात्री बारा वाजता कोणाचा फोन आला तर, उचलून सामान्य लोकांची कामे करणारा नेता म्हणजे मुंडे साहेब, माणसं जातीच्या आधारावर नाही तर, कर्तुत्वाच्या आधारवार मोठी होत असतात. पंकजाताईचे कर्तुत्व आणि नेतृत्व क्षमतेचे असून त्यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यासह मारठवाड्याचा आणि राज्याचा विकास झाल्या शिवाय राहणार नाही हा विश्वास त्यांनी दिला. या सभेला भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री आ. बबनराव लोणीकर, आ. प्रकाश दादा सोळूके, आ. लक्ष्मण पवार, मोहन जगताप, रमेशराव आडसकर, देविदास राठोड, बाबुराव पोटभरे, नितीन नाईकनवरे, डॉ. योगेश क्षीरसागर, डॉ. प्रकाश आनंदगांवकर, अरुण आबा राऊत, आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री गिरी यांनी केले तर आभार प्रदर्शन शहर अध्यक्ष दळवी यांनी मांडले. अक्षय तृतीयाचा दिवस असताना देखील मोंढा मैदानावर पार पडलेल्या सभेला मोठ्या संखेने लोक उपस्थित होते.

राजकारणात माणूस जातीने नव्हे
तर गुणाने मोठा होत असतो
माजलगावच्या सभेत नितीन गडकरींनी जोरदार भाषण केले. राजकारणात माणूस जातीने नाही तर गुणाने मोठा होतो हे सांगताना गडकरींनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श सर्वांच्या डोळ्यासमोर उभा केला, त्यामुळेच पंकजाताईंचे कर्तृृत्व आणि नेतृत्व मोठे असून तिला मोठ्या मताधिक्यांनी संसदेत पाठवा, असे आवाहन यावेळी गडकरींनी केले.

तुम्ही प्रीतमला मतदान दिल्यामुळेच मोदी
पंतप्रधान आणि मी मंत्री
तुम्ही मागच्या दोन्ही निवडणूकीत प्रीतमला मतदान केल्यामुळेच मोदीजी पंतप्रधान तर मी मंत्री झालो, त्यामुळे आम्हाला बीडसह देशाचा विकास करता आला आता पंकजाला विजयी करून पुन्हा बीड जिल्ह्याचे भाग्य बदलण्यासाठी पुढे या असेही यावेळी गडकरींनी केले.

काँग्रेसने सर्व सामान्यांना विकासापासून
साठ वर्ष वंचित ठेवले
कॉँग्रेसने देशात 60 वर्ष व्यवस्था चालवताना गरीबी हटवाचा नुसता नारा दिला. पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी वीस कलमी कार्यक्रम हाती घेतल्याचे सांगत देशातील सामान्य जनतेला विकासापासून वंचित ठेवले. मात्र अवघ्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉँग्रेसने जे 60 वर्षात केले नाही, तशा प्रकारचा देशाचा विकास मोदींनी फक्त दहा वर्षात करून दाखविल्याचा उल्लेखही यावेळी गडकरींनी केला.

माझ्या राजकीय जीवनात मुंडे साहेबांचा
सिंहाचा वाटा
गोपीनाथराव मुंडेंची आठवण काढत गडकरींनी माझ्या राजकीय जीवनात त्यांचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगितले. रात्री बारा वाजता कोणाचा फोन आला तर, उचलून सामान्य लोकांची कामे करणारा नेता म्हणजे मुंडे साहेब असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.

10 हजार कोटी रस्ते विकासाला दिल्याबद्दल,
पंकजाताईनी गडकरींची मानले आभार
या जाहीर सभेत भाषणाच्या सुरवातीलाच आदरणी गडकरी असा उल्लेख करत नितीन गडकारींनी माझ्या वडिलांच्या सोबत राजकीय जीवनात काम केले. माझ्यासाठी ते नेता नसून काका असल्याचा उल्लेख त्यांनी केला. विकासाचे महापुरुष अशी ओळख त्यांची असून आपल्या बीड जिल्ह्यात रस्ते विकासासाठी केंद्रात सरकार आल्यानंतर माझ्या एका पत्रावर सुमारे दहा हजार कोटी काम मंजूर केल्याबद्दल त्यांनी जाहीर सभेत त्यांचे आभार मानले. बीड जिल्ह्यात आम्हाला तरुणांना रोजगार मिळावा महणून एक मोठा उद्योग आणि गरिबांच्या आरोग्य रक्षणासाठी कॅन्सर हॉस्पिटल उभा करायचे असून आमचे पालकत्व स्वीकारावे असे सांगत राजकारणात काम करताना मी केवळ विकासाचे राजकारण केल्याचा उल्लेख त्यांनी केला.

जिल्ह्यात कॅन्सर हॉस्पिटल अन्
मोठ मोठे उद्योग आणण्याचा संकल्प
बीड जिल्ह्यात आम्हाला तरुणांना रोजगार मिळावा महणून एक मोठा उद्योग आणि गरिबांच्या आरोग्य रक्षणासाठी कॅन्सर हॉस्पिटल उभा करायचा संकल्प पंकजाताईंनी केला असून यासाठीच जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारावे असे ताईंनी केले त्यावर गडकरींनीही ताईंचा हा प्रस्ताव स्विकारला आहे.

आम्हाला भारताला विश्‍वगुरू करायचेय
आम्ही फक्त आमदार, खासदार किंवा मंत्री होण्यासाठी राजकारणात आलो नाही तर आम्हाला भारताला विश्‍वगुरू करायचे असल्याचेही गडकरींनी यावेळी म्हटले.

भाजप वाढविण्यासाठी मुंडे-महाजनांनी
जिवाचे राण केले

मला मुंडे साहेबांच्या नेतृत्वात काम करण्याची संधी मिळाली, ते सर्व सामान्यांचा आवाज होते, त्यांच्या सारखा लोकनेता पुन्हा होणार नाही, भाजप वाढविण्यासाठी मुंडे-महाजन या जोडीचा सिन्हाचा वाटा राहिलेला आहे. त्या दोन्ही नेत्यांचे आशिर्वाद मला मिळाले असल्याचेही गडकरी यावेळी म्हणाले.

Exit mobile version