Site icon लोकाशा-बंब न्यूज

खा. प्रितमताई मुंडे यांचा वाड्या-वस्त्यांवर पोहोचून प्रचार, आपल्या हक्काचा प्रतिनिधी म्हणुन पंकजाताईंना दिल्लीत पाठवा, तुमच प्रत्येक मत जिल्ह्याच्या विकासाला गती देईल, खा. प्रितमताई मुंडे

अंबाजोगाई । दि. २७ । ( शनिवार )
महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात पायाभूत सुविधांसह अनेक अभूतपूर्व विकास कामे पूर्ण झाली आहेत. जिल्ह्याच्या पालकमंत्री असताना पंकजाताई मुंडे यांनी सर्व घटकांना मागणीनुसार निधी उपलब्ध करून दिला, विकास कामांसाठी निधी देताना त्यांनी कधीही भेदभाव केला नाही, कुणाचा आकस अथवा द्वेष केला नाही. प्रत्येक गावाला आणि वाड्या-वस्त्यांना त्यांनी मागेल तेवढा विकास निधी हक्काने उपलब्ध करून दिला, मधील पाच वर्षाच्या काळात विकासाची ही प्रक्रिया मंदावली होती. लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याची संधी आपल्याकडे चालून आली आहे. या संधीचा सदूपयोग करून आपल्या हक्काचा प्रतिनिधी पंकजाताईंच्या रूपाने दिल्लीत पाठवा, पंकजाताईंना तुम्ही दिलेल प्रत्येक मत हे जिल्ह्याच्या विकासाला गती देणार असेल’ अशी ग्वाही खा. प्रितमताई मुंडे यांनी मोरेवाडी जिल्हा परिषद गटातील मतदारांना दिली.

भाजप आणि महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारानिमित्त अंबाजोगाई तालुक्यातील कुरनवाडी, येल्डा,चिचखंडी, राक्षसवाडी, ममदापुर, पठाण मांडवा, काळवटी तांडा, साकूड, शेपवाडी या गावांना भेटी दिल्या. यादरम्यान मतदारांशी संवाद साधताना खा. प्रितमताई मुंडे बोलत होत्या. केज विधानसभेच्या आ. नमिता मुंदडा, युवा नेते अक्षय मुंदडा, बालासाहेब दौडतले, बालासाहेब शेप, मधुकरराव काचगुंडे,अच्युत गंगणे,लक्ष्मण करनर, दिलीप चामनर,बाळा गायके यांच्यासह भाजप आणि महायुतीचे कार्यकर्ते या प्रचार दौऱ्या यादरम्यान उपस्थित होते.

पुढे बोलताना खा.प्रितमताई मुंडे म्हणाल्या की ‘बीड जिल्ह्यातील मतदारांनी सातत्याने आम्हाला जनतेची सेवा करण्याची संधी दिली आहे, त्या संधीचा सदुपयोग करत सर्वसामान्यांचे कष्ट कमी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही पंकजाताईंच्या नेतृत्वात केला आहे. आम्ही केलेला विकास हाच आमचा विश्वास असल्यामुळे बीडची जनता पुन्हा एकदा पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमातून सेवेची संधी आम्हाला देणार आहे, कारण पंकजाताई या प्रामाणिक, स्वच्छ आणि नीतिमत्ता असलेल्या उमेदवार आहेत. लोकसभेत पंकजाताई मुंडे यांचा विजय निश्चित आहे, या विजयात पंकजाताईंना मतदान करून सन्मानजनक मताधिक्य मिळवून दया असे आवाहन याप्रसंगी खा. प्रितमताई मुंडे यांनी ठिकठिकाणी केले.

केज मतदारसंघातून मोरेवाडी गट देणार पंकजाताईंना सर्वाधिक मताधिक्य

महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी पालकमंत्री असताना मोरेवाडी जिल्हा परिषद गटातील डोंगरदऱ्यात वसलेल्या वाड्या-वस्त्यांना विकासाचा स्पर्श दिला आहे, आजपर्यंत पंकजाताईंनी आम्हाला न मागता विकास निधी उपलब्ध करून दिला. आम्हाला हक्काने पायाभूत सुविधा, रस्ते, आरोग्य व्यवस्थेशी निगडित सुविधा देणाऱ्या पंकजाताईंना लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून काहीतरी देण्याची संधी आम्हाला मिळाली आहे. मोरेवाडी जिल्हा परिषद गटातील मतदार म्हणून या संधीचा आम्ही पुरेपूर उपयोग करत केज मतदारसंघातून आमचा गट सर्वाधिक मताधिक्य देईल’ असा निर्धार यादरम्यान ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधीनी केला.

Exit mobile version